उपराजधानी नागपूरच्या एनएच ४७ वर कोराडी नाक्यावर (Koradi Naka) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाई (Y) आकाराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला २० जूनपासून सुरुवात होणार असून, ८ महिन्यांत ते पूर्ण होईल.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर अचूक हवाई हल्ले करत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड प्रतिउत्तर दिले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला उद्योजिकेने (Female industrialist) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंग, फसवणूक, धमकी आणि अश्लील वर्तनाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपी सध्या फरार आहे.
Rain and hail in some areas of Nagpur | शहरात शनिवारी दुपारनंतर अचानक हवामानात मोठा बदल दिसून आला. काही भागांमध्ये जोरदार वारे वाहू लागले, त्यानंतर पावसासह गारपीट झाली. अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला, ज्यामुळे नागपूरकरांना तीव्र उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र दुसऱ्या काही भागांमध्ये सूर्यप्रकाश आणि उष्णतेने हैराण करणारा अनुभव कायम राहिला.
नागपूरच्या (Nagpur) वानाडोंगरी येथील स्मशानभूमीजवळ शुक्रवारी सकाळी ३४ वर्षीय नितेश नरेंद्र भोळे यांचा बेशुद्धावस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासानुसार उष्माघातामुळे नितेशचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि कामगार दिनानिमित्त कामठी तहसील कार्यालयात भव्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस उपराजधानी नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कस्तुरचंद पार्क येथे पार पडलेल्या या शासकीय समारंभात पालकमंत्री (Guardian Minister) चंद्रशेखर बावनकुळे यांनी ध्वज फडकावून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली.
अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) अगोदर नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याच्या तयारीत होते. मात्र, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करत हे दोन्ही विवाह थांबवले आणि संबंधित मुलींना बालगृहात हलवून संरक्षण दिले.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आता बंद्यांसाठी हायटेक कोर्टरूम (Hi tech courtroom) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहात वाढती कैद्यांची संख्या आणि त्यांच्याशी संबंधित सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेता, ही बाब काळानुरूप महत्त्वाची ठरते.
शहरातील कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल (Dr Ravindra Singal) यांनी रात्री ८ ते १० या वेळेत अचानक फूट पेट्रोलिंग करत विविध भागांत थेट भेटी दिल्या. त्यांच्या या कृतीने पोलीस दलात हलचल माजली असून, नागरिकांमध्ये समाधानाचा सूर उमटला आहे.
Man murdered his girlfriend in Nagpur | शहरातील दाभा परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागपूरकर सुन्न झाले. संशयाच्या गर्तेत अडकलेल्या एका युवकाने आपल्या प्रेयसीचा बेधडक खून केला. मृत महिला हेमलता वैद्य (३४) या एका नामांकित बिल्डरच्या ऑफिसमध्ये कार्यरत होत्या. आरोपी अक्षय दाते (२६) हाच तिचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते.
शहराच्या प्रसिद्ध जीरो माईल (Zero Mile) परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे नागपूर शहरातील नागरिक चिंतित झाले आहेत. ६० वर्षांच्या मानसिक अस्वस्थ आणि बेघर महिलेचा मृतदेह एका स्थानिक युवकाच्या माहितीवरून पोलिसांनी ताब्यात घेतला.
मानकापूर पोलिसांनी एमडी ड्रग्ज (MD drugs) तस्करी प्रकरणी तिघा जणांना अटक करून मोठा छापा टाकला आहे. वर्धा जिल्ह्यातून काही इसम नागपुरात अमलीपदार्थ खरेदीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत ४.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भारताच्या (India) ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीला पाकिस्तानने आणखी तीव्रतेने पेटवत अचानक हल्ल्याची मालिका सुरू केली. मात्र, भारतीय लष्कर आणि वायुसेना सतर्क असतानाच त्यांनी तात्काळ आणि आक्रमक प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ले चढवले.
Indian Army takes another major action Attack on air defense system in Lahore | भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला जबर झटका दिला आहे. शस्त्रसंधीचा भंग करत पाकिस्तानने अमृतसर परिसरात मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तत्काळ प्रत्युत्तर देत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिमवर अचूक हल्ला केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर भेदक कारवाई केली. या ऐतिहासिक मोहिमेची सविस्तर माहिती ७ मे रोजी भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भारताच्या "ऑपरेशन सिंदूर" मोहिमेमुळे पाकिस्तानात (Pakistan) मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई करत किमान 9 प्रशिक्षण केंद्र नष्ट केली. या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली असून, गुरुवारी रात्री त्यांनी भारतावर प्रतिहल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला.
केंद्र सरकारने पाकिस्तानमधील १६ युट्यूब चॅनेल्सवर (YouTube channels) बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चॅनेल्सवर भारताविरोधात भडकवणारे व खोटी माहिती पसरवणारे कंटेंट दिसून आले होते. यावर भारताने त्वरित कारवाई केली आहे.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने देशभरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याचे सूत्रधार अद्याप समोर आले नसताना पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदुर’द्वारे दहशतवाद्यांवर घातलेला घाव संपूर्ण जगाच्या लक्षात राहिला. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणांवर अचूक हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यात आले.
Shinde group extends open invitation to Congress rebels in Kolhapur | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देत येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना प्रचंड गती मिळाली आहे. विविध पक्षांत अंतर्गत कुरबुरी, नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली असून, काँग्रेसमध्ये नाराज नेत्यांना शिंदे गटाने खुले आमंत्रण दिल्याने सत्ताकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कारवाईबाबत संमिश्र भूमिका मांडत युद्धाची दिशा चुक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
देशभरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, सरकारने जर युद्धाचे धोरण स्वीकारले, तर काँग्रेस पाठिंबा देईल, असे स्पष्ट केले आहे.
देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या जबाबदारीत अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पहलगाम येथे घडलेल्या नरसंहारानंतर राजकीय वातावरण तापले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. या हल्ल्याला जबाबदार व्यक्ती गृहमंत्रीच आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणत राजकारण करावं, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी केसी कॉलेज सभागृहात आज जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अजित पवारांनी आपले मत मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात लवकरच नेतृत्व पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार (Sharad Pawar) लवकरच पक्ष संघटनेत नव्या नेतृत्वाची नियुक्ती करणार असून, यासाठी वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत पूर्ण झाली आहे.
साताऱ्यात भाजपच्या (BJP) संघटन पर्वत २ उपक्रमाअंतर्गत जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेने वेग घेतला असून, इच्छुकांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याची शक्यता चर्चेत आली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा त्वरेने हटवावी. त्यांच्या मते, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे सर्व समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल आणि विकास प्रक्रियेत समान संधी प्राप्त होईल.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय नाव असलेल्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. सध्या त्या त्यांच्या नवीन नाटकामुळे चर्चेत असल्या, तरी ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे आजही त्यांची ओळख कायम आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा बळी गेला असून, देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
Abir Gulal film banned in India | जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या आगामी हिंदी चित्रपटावर भारतात थेट बंदी घालण्यात आली आहे. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास भारत सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) भागात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांच्या धर्माची विचारपूस करून त्यांच्यावर बेधडक गोळीबार करण्यात आला. यात 28 जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghels) यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (ता.10 मार्च) रोजी पहाटे धाड टाकली. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.ईडीकडून छत्तीसगडमधील एकूण 14 ठिकाणी छापे सुरु आहे.
16 Naxalites killed in an encounter| छत्तीसगडमधील गारियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादीही ठार झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सोन्याचे (Gold) दर लवकरच मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली असून, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्जदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे SBI कडून गृहकर्ज किंवा MSME कर्ज घेणाऱ्या लाखो ग्राहकांना त्यांच्या EMI मध्ये थेट फायदा होणार आहे.
आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Stock market) अत्यंत निराशाजनक ठरला आहे. कोविड काळानंतरची सर्वात मोठी घसरण आज नोंदवण्यात आली. निफ्टी तब्बल 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स 3000 अंकांनी खाली गेला. यामुळे 19 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलाचा वायफळ झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एसटी महामंडळात (ST Corporation) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Story of brother Yamraj and sister Yamuna । दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai won Irani Cup after 27 years | सर्वाधिक रणजी ट्रॉफी आपल्या नवी करणाऱ्या मुंबईने आता इराणी चषक वर नाव कोरले आहे. तब्बल २७ वर्षांनी मुंबई संघाने चमकदार कामगिरी करीत इराणी चषकावर कब्जा केला. शेष भारत विरुद्ध मुंबई असा सुरु असलेल्या सामना अनिर्णित ठरल्याने मुंबईकडे पहिल्या डावात आघाडी असल्याने मुंबईला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.
नेपाळमधील (Nepal) नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी (Meena Kumari) यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते.